जानवली नदीत युवकाचा मृतदेह ; घातपाताचा संशय

0
2884

कणकवली | प्रतिनिधी | दि. १४ :  शहरातील गणपती साणा येथे आज सकाळी मॉर्निंग वॉक तसेच कपडे धुवायला गेलेल्या महिला यांना युवकाचा मृतदेह नदीत तरंगताना दिसून आला. त्यानंतर त्याची खबर पोलिस ठाण्याला देण्यात आली. दरम्यान, शहरातील गणपती साणा येथे जानवली नदीत एक जण बुडाल्याचा शक्यता काल (बुधवारी) वर्तवण्यात येत होती. त्यावेळी नदीकिनारी कुंदन प्रसाद (उत्तरप्रदेश) या व्यक्तीचे आधार कार्ड मोबाइल कपडे व चप्पल आढळून आले होते. तर कालच (बुधवारी) दुपारी नदीपात्रात एक व्यक्ती बराच वेळ आंघोळ करत असल्याचेही काहींनी पाहिले होते.

त्यानंतर सदर घटनेची माहिती समजतात पोलीस बुधवारी रात्री गणपतीचा साणा येथे दाखल होत स्थानिकांच्या तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय मालडकर यांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली असता रात्री अंधार असल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली होती. तर कुंदन प्रसाद हा जानवली – आदर्श नगर एका व्यवसायिकाजवळ कामाला होता असल्याचीही माहिती समोर येत आहे. तसेच याबाबत काल रात्री पोलिसात नोंद करण्यात आली होती. मात्र, आज पुन्हा शोधमोहिम सुरू करण्याआधीच ‘त्या’ युवकाचा मृतदेह सापडल्याने घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

यावेळी घटनास्थळी मॉर्निंग वॉक ला गेलेले शहरातील नागरिक संतोष मालंडकर, अमित केतकर, संजय टाकले याशिवाय आदी उपस्थित होते. तर सद्या नदीत असलेल्या कमी पाण्यात तो युवक नेमका कसा बुडाला? त्याची तब्बेत तर चांगली होती का? आदी सवाल स्थानिक उपस्थित करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.