भीषण अपघातात कुडाळचा युवक जागीच ठार ; एक गंभीर

0
12375

कुडाळ : कुडाळ मधील क्रेटा गाडीला उत्तुरमध्ये भीषण अपघात // भीषण अपघातात कुडाळ मधील रोहित रमाकांत कुडाळकर, वय 22 जागीच ठार // महाबळेश्वरहुन कुडाळ येथे घरी परतत असताना साडेतीन वाजता झाला भीषण अपघात // कुडाळ येथील अक्षय वालावलकर यांच्या मालकीच्या एम. एच. ०७ ए.जी.-५१६६ उत्तुर जि.कोल्हापूर येथे भीषण अपघात // ओंकार मंगेश वालावलकर हे आपल्या भावाच्या मालकीची गाडी घेवून आपले मित्र रोहन कुंभार, जगन्नाथ पेडणेकर, सायल परब, रोहीत कुडाळकर असे पाच जण मिळून महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी फिरायला गेले होते // पर्यटन आटपून कुडाळला परत येत असताना पहाटे उत्तर येथे साडेतीन वाजता गाडी आली असता चालक ओंकार वालावलकर याचे गाडीवरील नियंत्रण सुटले // आणि गाडीने तीन पलटी मारल्या // यात रोहीत रमाकांत कुडाळकर वय 22 हा जागीच ठार झाला // तर जगन्नाथ पेडणेकर हा गंभीर जखमी झाला // गंभीर जखमी जगन्नाथ पेडणेकरला तत्काळ गडिंग्लज येथील हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले // तर ओंकार वालावलकर, सायल परब, रोहन कुंभार हे किरकोळ जखमी झाले असून आजरा पोलीस ठाण्यात त्यांचे जाबजबाब चालू आहेत //घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे सुशील चिंदरकर, राजू गावंडे, राम राऊळ, शेखर कुंभार यासह कुडाळमधील लोकानी घटनास्थळी धाव घेतली // मदत कार्य सुरू केले आहे // सुशील चिंदरकर सह टीम आजरा पोलीस ठाण्यात दाखल झाली //दरम्यान या घटनेने कुडाळ शहरावर शोककळा पसरली आहे // मृत रोहीत रमाकांत कुडाळकर च्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून थोड्याच वेळात मृतदेह कुडाळ मध्ये आणण्यात येणार // मृत रोहीत कुडाळकर हा खालची कुंभारवाडी येथील असून आईवडीलांचा एकुलता एक मुलगा // तर वडील अपंग असून कष्ट करून मुलाला मोठ केल होत // कुडाळकर कुटुंबियांवर काळाचा घाला //

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.