जिल्ह्याला कोरोना लसीचे मिळणार एवढे डोस…!

0
541

सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी | दि. १४ : बहुप्रतिक्षित कोरोनावरील लस सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज गुरुवारी उपलब्ध होणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. आरोग्य विभागाचे वाहन लस आण्यासाठी कोल्हापूरला गेले असून संध्याकाळपर्यत जिल्ह्यात लस घेऊन दाखल होणार आहे. जिल्ह्याला १० हजार ५०० डोस मिळणार असून १६ जानेवारीपासून लसीकरणला सुरुवात होणार आहे. जिल्हा रुग्णालय, कणकवली, सावंतवाडी आणि शिरोडा उपजिल्हा रुग्णालय ही चार केंद्रे लसीकरणासाठी निश्चित केली असून प्रत्येक केंद्रावर दररोज १०० जणांना लस दिली जाणार आहे. अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून प्रशासन सज्ज असल्याची माहिती देण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.