माजी पं. स. सभापतींना न्यायालयाचा धक्का..!

0
1208

सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी | दि. १४ : उमेद अभियान अंतर्गत २२ लाख रुपये निधीचा संगनमताने अपहार करुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. कुडाळ पंचायत समितीच्या माजी सभापती समिधा घावनळकर, रा, घावनळे यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायाधीश २ आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी फेटाळून लावला आहे. सरकार पक्षाच्यावतीने जिल्हा सहाय्यक सरकारी अभियोक्ता रुपये देसाई यांनी काम पाहिले.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.