ग्रामपंचायत निवडणूक ; कुडाळ सज्ज

0
428

कुडाळ |प्रतिनिधी | दि. १४ : कुडाळ तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूका शुक्रवार दि. १५ रोजी पार पडणार आहेत. यासाठी २७ केंद्रामध्ये नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी आज आपापल्या केंद्राकडे रवाना झाले.

तालुक्यातील आकेरी, गोवेरी, माड्याचीवाडी, वसोली, वाडोस, गोठोस, पोखरण-कुसबे, गिरगाव-कुसगाव, कुपवडे या ग्रामपंचायतीच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. ९ ग्रामपंचायतीच्या मिळून २७ केंद्रात मतदान केंद्राध्याक्षसह १०८ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक केंद्रात ४ कर्मचारी नेमण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक केंद्रात १ पोलीस अंमलदार नेमण्यात आला आहे. त्यासाठी १ पोलीस निरीक्षक, १ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ३ पोलीस उपनिरीक्षक, ४२ पोलीस अंमलदार आणि १८ होमगार्डस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.