आता महिनाभर चालणार रस्ता सुरक्षा अभियान..!

0
500

सिंधुदुर्गनगरी | प्रतिनिधी | दि. १४ : नागरिकांना रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवून देण्यासाठी अनेक वर्षापासून राबवत येणाऱ्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचा कालावधी वाढवीण्यात आला आहे. याआधी सात दिवसासाठी राबववीण्यात येणारा सप्ताह यावेळी महिनाभर साजरा होणार आहे. त्यामुळे रस्ते अपघाताबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी सरकार प्रभावी अंमलबजावणी करत असल्याचे दिसून येत आहे.

गतवर्षी 11 ते 17 जानेवारी दरम्यान राज्यभरात रस्ता सुरक्षा सप्ताह पार पडला. मात्र यावर्षी 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी या महिनाभराच्या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे रस्ते अपघाताबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी अधिकाधिक कालावधी मिळणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा रस्त्यावर जनजागृती करण्यावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे ऑनलाइन कार्यक्रमावर भर देण्यात येणार आहे. परिवहन कार्यालय वाहतूक पोलीस आणि विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने यंदा महिनाभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.