रेडी माऊली शाळेला ग्रा.पं.तर्फे स्वयंचलित तापमान तपासणी, सॅनिटायझर यंत्र

0
115

वेंगुर्ले | प्रतिनिधी | दि. १४ : श्री माऊली विद्यामंदिर रेडी येथिल विद्यार्थ्यांचे तापमान मोजणारे स्वयंचलित तापमान तपासणी व सॅनिटायझर यंत्र येथील ग्रामपंचायत रेडी यांच्यातर्फे सरपंच रामसिंग राणे यांनी मुख्याध्यापिका श्रीमती गोसावी यांच्याकडे सुपूर्द केले.

कोरोना पार्श्वभूमीवर आठ महिन्यांनी शाळांचे नववी व दहावी वर्ग सुरू झाले आहेत. मात्र शाळेत विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांची तापमान तपासणी सक्तीची करण्यात आली आहे. त्याचबरोबर मास्क, सोशल डिस्टन्स, हात स्वच्छता हे खबरदारी नियम बंधनकारक आहेत. श्री माऊली विद्यामंदिर रेडी येथे या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून वर्ग सुरू करण्यात आले आहेत.

शाळेत प्रवेश करताना विद्यार्थ्यांची तापमान तपासणी व हात स्वच्छता एकाच वेळी व्हावी या उद्देशाने तापमान तपासणी व सॅनिटायझर यंत्र ग्रामपंचायत रेडी यांच्यावतीने प्रशालेस भेट देण्यात आले. यावेळी उपसरपंच नामदेव राणे, सदस्य विनोद नाईक, शैलेश तिवरेकर, गायत्री सातोस्कर, आनंद भिसे, ग्रामविकास अधिकरी प्रल्हाद इंगळे, सामाजिक कार्यकर्ते नंदू मांजरेकर, नाना सातोस्कर, सचिन तिवरेकर आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.