सावंतवाडीत ५४ मतदान केंद्रावर शांततेत मतदान…!

0
133

सावंतवाडी | प्रतिनिधी | दि. १५ : तालुक्यातील ११ ग्रामपंचायत निवडणुकीच्या ११९ जागांसाठी २६५ उमेदवार निवडणूक रिंगणात असून तालुक्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी तब्बल ३१ हजार ८६४ जण मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात १५ हजार ६१५ स्त्रिया तर १६ हजार २४९ पुरुष मतदानाचा अधिकार बजावणार आहे. तब्बल ५४ ठिकाणी मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया शांततेत सुरू आहे. प्रत्येक केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष यांसह पोलिस कर्मचारी, अतिरिक्त कर्मचारी यांची फौज तैनात असून मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी तहसीलदार राजाराम म्हात्रे, पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांसह निवडणूक निर्णय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष विशेष मेहनत घेत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.