दोडामार्गात ६८.३१ मतदान..!

0
323
  1. दोडामार्ग | संदीप देसाई | दि. १५ :  तालुक्यात आयनोडे हेवाळे, कुडासे व तेरवण मेढे या ग्रामपंचायत निवडणूकसाठी ६८.३१ टक्के इतके मतदान झाले. आयनोडे हेवाळेत सर्वाधिक ८०.३९ टक्के इतके मतदान झाले आहे. तालुक्यात एकूण 2250 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून तिन्ही ग्रामपंचायतीच्या ३४  उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं आहे. निवडणूक प्रक्रिया सर्वत्र सुरळीत व शांततेत पार पडली असून अबाल वृद्धांनी कोविड काळातही मतदानाला उस्फूर्त प्रतिसाद दिल्याचे एकंदरीत चित्र आहे. मात्र अपवाद कुडासे गावच्या प्रभाग ३ साठी सर्वात कमी ६२.४७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे याच केंद्रावर कित्येक 90 ओलांडलेल्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

ग्रामपंचायत निहाय झालेले मतदान

आयनोडे हेवाळे 80.39 टक्के
प्रभाग 1 झालेले मतदान 141
प्रभाग 2 झालेले मतदान 164
प्रभाग 3 झालेले मतदान 191

तेरवण मेढे 66.42 टक्के
प्रभाग 1 झालेले मतदान 512
प्रभाग 2 – बिनविरोध
प्रभाग 3 झालेले मतदान 283

कुडासे 64.89 टक्के
प्रभाग 1 झालेले मतदान 266
प्रभाग 2 – झालेले 242
प्रभाग 3 झालेले मतदान 451

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.