भीषण दुर्घटना… ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकने मजुरांना चिरडले.!

0
1300

सुरत, दि. 19 : गुजरातच्या सुरतमध्ये भीषण अपघाताची दुर्घटना घडली आहे. सुरतच्या पिपलोद गावानजीक एका ट्रकनं रस्त्याच्या कडेला झोपलेल्या 18 मजुरांना चिरडलं. त्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला असून इतर 4 जण गंभीर जखमी आहेत. जखमींना  उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृत 14 जणांमध्ये एका लहान मुलीचाही समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे.

ऊसाची वाहतूक करणारा ट्रक अतिशय वेगात पुढे जात असल्यानं चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे गाडी नियंत्रणात न आल्यानं रस्त्याच्या कडेला तो ट्रक झोपलेल्या मजुरांच्या अंगावर गेला. या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेले लोक मजूरीचं काम करणारे असून सर्वचजण राजस्थानच्या बासवाडा जिल्ह्यातील कुशलगडचे रहिवाशी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.