सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार धवलक्रांती

0
513
कणकवली : होय !! जिल्ह्यात आता धवलक्रांती होणार. जिल्हा दूध उत्पादक संस्थेचे दूध आता ‘महानंदा’ घेणार आहे. याबाबतची दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या दालनात बुधवारी बैठक झाली. माजी आमदार प्रमोद जठार यांची मेहनत फळाला आली. आर्थिक सक्षमीकरणासाठी जिल्हा दूध उत्पादक संस्थेला २५ लाखाचा निधी देणार असल्याची माहिती मंत्री जाणकर यांनी दिली. माजी आमदार प्रमोद जठार यांच्यामुळे जिल्ह्यातील असंख्य दुध व्यावसायिकांना दिलासा मिळालाय. 
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.