गेल्या वर्षी, हाच तो दिवस..! मयुरीनं दिला आठवणींंना उजाळा.!

0
535

मुंबई, दि. 20 : ‘गेल्या वर्षी, हाच दिवस…आमच्या लग्नाचा वाढदिवस. मला आनंद आहे की, अँँनीव्हर्सरीला रोमँटिकपेक्षा आपण अन्डव्हॅचरस डेटवर गेलो होतो. त्यामुळं आम्ही खूप हसलो होतो. तुझ्यासोबतच्या त्या हास्य आठवणींत आणखी भर पडली’, अशी भावुक पोस्ट मयुरीनं शेअर केली आहे. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मयुरी देशमुखनं आशुतोषच्या आठवणींत ही खास पोस्ट शेअर केली आहे.

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता आशुतोष भाकरे यानं केलेल्या आत्महत्येमुळं सर्वांनाच धक्का बसला होता. डिप्रेशनमुळं आशुतोषनं त्याचं आयुष्य संपवलं. त्याच्या अचानक जाण्यानं त्याची पत्नी अभिनेत्री मयुरी देशमुख हिला देखील धक्का बसला. आता इतक्या दिवसांनतर तिनं पुन्हा एकदा आशुतोषसोबच्या आठणींना उजाळा दिला आहे.

‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून मयुरीनं स्वतःची ओळख करून दिली होती. आता ‘इमली’ या मालिकांमधून ती पुढे येतेय. 
ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.