कुंडली बाहेर काढली तर सावंतवाडी सोडाल ; साळगांवकरांच्या टीकेवर अजय गोंदावळेंचा पलटवार

0
660

सावंतवाडी | प्रतिनिधी | दि. २१ :  शहराच्या विकासात खोडा घालायच काम माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केल आहे. विकास करू पहाणाऱ्या नगराध्यक्ष संजू परब यांच्यावर ते खोटे आरोप करत आहेत. कोरोना काळात बबन साळगावकर कुठे लपून बसले होते‌‌ ? संपूर्ण सावंतवाडी बंद असताना उपासमारीची वेळ आलेल्या लोकांसाठी ते पुढे नाही. बबन साळगावकर यांनी संजू परब यांची खोटी बदनामी बंद करावी, अन्यथा तुमची कुंडली बाहेर काढू. जर तुमची कृत्य बाहेर काढली तर तुम्हाला सावंतवाडी सोडावी लागेल असा इशारा भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांनी दिला आहे‌.

जे बबन साळगावकर दीपक केसरकरांचे झाले नाही, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसणारे साळगावकर सावंतवाडीकरांचे काय होणार असा पलटवार केला. तर रात्री अपरात्री साळगावकर गोव्यात कशासाठी आणि कोणाला घेऊन जात होते हेही त्यांनी जाहीर करावं असं आव्हान गोंदावळे यांनी दिली.

तर १७ – ० असताना बबन साळगावकर यांच्या काळात ५० लाखांंचा भ्रष्टाचार झाला असा आरोप गोंदावळे यांनी केला. यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावळे, निशांत तोरसकर, बंटी राजपुरोहित, केतन आजगावकर, अमित परब, परिणीती वर्तक आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.