शिवसेना नाटळ-हरकुळ विभागामार्फत शनिवारी रक्तदान शिबीर

0
212

कणकवली | प्रतिनिधी | दि. २१ : शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दि. २३ जानेवारी रोजी शिवसेना नाटळ आणि हरकुळ विभागाच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलय. या शिबिरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभागी होत रक्तदान करावं, असं आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख डॉ.प्रथमेश सावंत यांनी केलं आहे.

शिवसेनापक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शिवसेना नाटळ आणि हरकुळ विभागाच्या वतीनं दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजरी केली जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा ब्लड बँकेत पुरेसा रक्तसाठा असणे आवश्यक आहे. त्यामुळेच सामाजिक भान राखत यावर्षी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, बाळा भिसे, नीलम सावंत आदी उपस्थित राहणार आहेत.

दि. २३ जानेवारी रोजी सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत रक्तदान शिबिर संपन्न होणार आहे. रक्तदान शिबिरात सहभागी होत कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख डॉ.प्रथमेश सावंत, नाटळ विभागप्रमुख आनंद आचरेकर, हरकुळ विभागप्रमुख बंड्या रासम यांनी केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.