वैभव नाईकांच्या माध्यमातन शाळांना थर्मल गन, ऑक्सिमीटर

0
304

कुडाळ | प्रतिनिधी | दि. २१ : कुडाळ तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक २८3 शाळांना आमदार वैभव नाईक यांच्या निधीतून थर्मल गन आणि ऑक्सिमीटरचे आमदार नाईक यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. राज्यातील सर्व शाळा २७ जानेवारी रोजी सुरु होणार आहेत. कोविड काळात या शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. या शाळा सुरु झाल्या नंतर या शाळांना थर्मल गन आणि ऑक्सिमीटरची गरज ओळखून आमदार नाईक यांनी यासाठी निधी उपलब्ध करुन दिला.

येथील पंचायत समितीच्या सभागृहात झालल्या कार्यक्रमात जि. प. सदस्य नागेंद्र परब, अमरसेन सावंत, प. स. सदस्य मिलिंद नाईक, श्रेया परब, माजी जि. प. अध्यक्ष विकास कुडाळकर, आगरप्रमुख सुजित डोंगरे, युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, तालुका प्रमुख राजन नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई, गटशिक्षणाधिकारी गोडे, बबन बोभाटे, अतुल बंगे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. नाईक म्हणाले, करोना काळात शाळा बंद होत्या. आता त्या सुरु होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. म्हणूनच सर्व शाळांना ऑक्सिमिटर व थर्मल गन देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर शाळांच्या काही समस्या असतील तर त्या सोडविण्यासाठी मी प्रयत्न करेन. तसेच या शाळा येत्या दोन वर्षांत डिजिटल करण्यात येतील.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल वालावलकर यांनी केले तर प्रस्तावना ग. शि. गोडे यांनी केले आणि आभार पं. स. उपसभापती जयभारत पालव यांनी मानले. यावेळी जि. प. सदस्य अमरसेन सावंत, नागेंद्र परब यांनी मार्गदर्शन केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.