कोकण पदवीधरमध्ये भाजपचे ‘डाव’खरे ठरले ; निरंजन डावखरेंचा मोठा विजय

0
370
: निवडणुक आयोगाकडून निरंजन डावखरे यांना अधिकृत विजयी घोषित करण्यात आले आहे. अंतिम निकालाची शुक्रवारी सकाळी पावणे सात वाजता घोषणा झाली. पहिल्या पसंतीच्या तीन फेरीत निरंजन डावखरे यांनी ५ हजार ८४० मतांचे मताधिक्य घेतले होते. विजयाचा शिक्कामोर्तब होवूनही डावखरे ३५ हजार १४३ मतांचा कोटा पूर्ण करू न शकल्याने दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणी करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. निरंजन डावखरे विजयी घोषित होताच भाजपने कोकणचा गड जिंकत एकच जल्लोष केला. यासंपूर्ण निकालाचा थेट नवी मुंबई येथील मतमोजणी केंद्राबाहेर ‘सिंधुदुर्ग लाईव्ह’चे प्रतिनिधी भरत केसरकर यांनी घेतलेला हा विशेष आढावा पहा.पहिल्या पसंतीमध्ये डावखरे हे विजयाचा आवश्यक कोटे पूर्ण करू न शकल्याने दुसरा पसंतीची मतमोजणी करावी लागली. दुसऱ्या पसंतीच्या फेरीत सर्व उमेदवारांना पडलेल्या मतांची पुन्हा मतमोजणी झाली. मतमोजणीत १२ उमेदवारांना बाद करण्यात आले. शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे यांची २४ हजार ७०४ मते ट्रान्सफरसाठी घेण्यात आली. ट्रान्सफरसाठी घेण्यात आलेल्या मतांपैकी २ हजार ६४० मते निरंजन डावखरे यांच्या पारड्यात पडली. २२ हजार ६४ मते एक्झॉस्ट आणि मतमोजणीत निरंजन डावखरे यांच्या मतांचे ३२ हजार ९९७ इतके मूल्य झाले. दुसऱ्या पसंतीच्या फेरीत सेनेचे संजय मोरे बाद होवून अखेर एकमेव भाजपचे निरंजन डावखरे रिंगणात राहिले. निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात याचा लगेच अहवाल पाठवण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी हे जाहीर केले. आयोगाच्या निर्णयानुसार अंतिम निर्णय जाहीर झाला. अखेर शुक्रवारी सकाळी पावणेसात वाजता  डावखरे यांच्या विजयाची अधिकृत घोषणा झाली. भाजपचे निरंजन डावखरे यांना ३२ हजार ९९७, सेनेचे संजय मोरे यांना २४ हजार ८७९ तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नजीब मुल्ला यांना १४ हजार ८१९ मतं मिळाली आणी निरंजन डावखरे यांचा ८ हजार ११८ मताधिक्याने विजय झाला. निवडणूक आयोगाच्या अनुमतीनंतर ही घोषणा करण्यात आली. अधिकृत घोषणेनंतर मतमोजणी केंद्राबाहेर भाजपने एकच मोठा जल्लोष  केला.
ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.