नवी दिल्ली | दि. ०१ : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी विविध मोठ्या मोठ्या घोषणा केल्या आहेत. मात्र सर्वसामान्यांना झटका देणारी बातमी समोर आली आहे. आता पेट्रोल आणि डिझेलवर कृषी अधिभार लागणार आहे. त्यामुळं लवकरच पेट्रोल डिझेल शंभरी गाठणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पेट्रोलवर 2.50 कृषी अधिभार तर डिझेलवर 4 रुपयांचा कृषी अधिभार लागणार आहे. जरी हा निर्णय घेण्यात आला असला तरी थेट कृषी अधिभाराचा परिणाम पेट्रोल डिझेल किमतींवर होणार नसल्याचं सांगितलं जात आहे.