नवीन मोबाईल खरेदी करताय ? ; मग तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी

0
349

नवी दिल्ली | प्रतिनिधी | दि. ०१ : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकतच संसदेत अर्थसंकल्प सादर केलं. या अर्थसंकल्पामध्ये यंदा सर्वसामान्यांचा अपेक्षा भंग झाल्या आहेत. तर टॅक्स स्लॅबमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. यंदाच्या बजेटमध्ये आरोग्य, शेतकरी, शिक्षण, पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात मात्र मोबाईलप्रेमी आणि नवीन मोबाईल खरेदी करणाऱ्यांची निराशा होणार आहे. 80 लागू न होणाऱ्या कस्टम ड्युटी रद्द करण्यात आल्या आहेत. पण मोबाईल आणि त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तुंवर कस्टम ड्युटी वाढवण्यात आली आहे. ज्या पार्ट्सवर शून्य टक्के कस्टम ड्युटी होती ती आता 2 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

मोबाईल आणि चार्जर महागणार आहेत. नवीन मोबाईल घेणार असाल तर या आर्थिक वर्षात तुमच्या खिशावर अधिक भार पडण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.