अगोदर कालवा फुटला आता पाईपलाईन ; तिलारीचं शुक्लकाष्ठ संपेना

0
457

दोडामार्ग | प्रतिनिधी | दि. ०४ : काही दिवसांपूर्वीच दोडामार्गातील कालवा फुटल्याची घटना ताजी असताना पुन्हा एकदा याची पुनरावृत्ती झाल्याचं दिसून आलं. आता घाट माथ्यावर तिराली वीजनिर्मितीसाठी जाणारी पाण्याची लाईन फुटली. यामुळे जलसंपदा विभागाचा बेजबाबदारपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय.

तिलारी वीजनिर्मिती प्रकल्पासाठी जाणारी पाण्याची लाईन तिलारी घाट माथ्यावर फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आणून तात्काळ पाणी बंद करण्याची मागणी केली. यावेळी दगड लावून पाणी दरीच्या बाजूने सोडले. त्यामुळे रस्त्यावर येणारे पाणी बंद झालंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.