सावंतवाडीतील महिलांचं अनोखं हळदीकुंकू ; वाण म्हणून दिलं तुळशीचं रोपटंं

0
245

सावंतवाडी | प्रतिनिधी | दि. ०५ : शहरातील माठेवाडा येथील जिल्हा परिषद शाळा नंबर दोन सुधाताई वामनराव कामत मधील अंगणवाडी क्रमांक 66 च्या वतीने एक तरी झाड लावा असा संदेश देत परिसरातील महिलांना तुळशी रोप देऊन हळदीकुंकू साजरा केला.

तुळशी रोपाचे आगळेवेगळे वाण देऊन पार पडलेल्या हळदीकुंकू समारंभामध्ये प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शुभांगी खानोलकर भक्ती फाले चैत्राली गवस गौरी सावंत साक्षी कर्पे प्रियंका तुळसुलकर नेहा पटेल प्रिया केसरकर राधिका मुंज प्रांजल मेस्त्री तसेच अंगणवाडीतील छोटी बालके कु गरिमा सावंत तीर्थना सावंत राज मुंज तनिष मेस्त्री साईश कर्पे वैभवी तुळसुळकर याशिवाय अंगणवाडीसेविका अनुराधा पवार मदतनीस अमिषा सासोलकर यांनी याकामी परिश्रम घेतले यावेळी शाळेमध्ये सुंदर रांगोळी रेखाटण्यात आली होती तर तीन वर्षे छोट्या बालकांनी सहभाग घेतला होता

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.