‘कोरे’च्या निष्काळजीपणामुळे मडुऱ्यात आंबा बागायतीस आग

0
400

बांदा : दि. ०८ : मडुरा रेल्वे स्थानकाजवळ कोकण रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या पॅनेल वेल्डिंगच्या कामाची ठिणगी आंबा बागायतीत पडल्याने मडुरा काजरमळी भागातील सुमारे दहा एकरातील काजू, आंबा, सागवान, आईन, किनळ, जांभूळ, आकाशी आदी झाडे जळून शेतकऱ्यांचे सुमारे चार ते पाच लाखांचे नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. आग विझविण्यासाठी शेतकऱ्यांनी धावपळ केली परंतु दुपारची वेळ असल्यामुळे त्यांचे हात तोकडे पडले. घटनास्थळी दाखल झालेल्या रेल्वे अधिकाऱ्यांना मात्र शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.