विश्वासात घेतल तरच महाविकास आघाडीतून लढणार ; राष्ट्रवादीची भूमिका

0
206

सावंतवाडी | प्रतिनिधी | दि.१२ : आगामी होऊ घातलेल्या नगरपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये इन्कमिंग सुरू आहे. जिल्हात राष्ट्रवादीची ताकद वाढत असल्याने पक्ष प्रवेश मोठ्या प्रमाणात होत असल्याचा विश्वास राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी व्यक्त केला आहे. यावेळी जिल्हा बँक निवडणुका महाविकासआघाडी च्या माध्यमातून लढवण्याचा आपला पूर्ण प्रयत्न असणार आहे‌‌. विश्वासात घेतल तरच महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार असून शिवसेनेनं देखील याबाबत त्यांच्या पदाधिकाऱ्यांना समज देण्याच मत त्यांनी व्यक्त केले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.