शिवजयंती साजरी करणारच : सुहास सावंत

0
315

कुडाळ | प्रतिनिधी | दि. १५ : राज्य सरकारने अटी घातल्या तरीही या अटी झुगारून दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी मोठ्या उत्साहात अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने शिवजयंती उत्सव साजरा करणार असल्याची माहिती महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अॅड सुहास सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी अटी शर्ती नियमावली का ठेवण्यात आली असा ही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. 19 फेब्रुवारीला शिवजयंती उत्सव सर्वत्र साजरा होणार असून कुडाळ येथेही अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने ही मोठ्या उत्साहात शिवजयंती उत्सव साजरा केल्या जाणार आहे. याबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

यावेळी अॅड सुहास सावंत, महासंघाचे कुडाळ तालुकाध्यक्ष सुंदर सावंत, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष मनोहर लिमये, मराठा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष दिनेश म्हाडगुत, अभीषेक गावडे, कार्यालयीन प्रमुख वैभव जाधव, शैलेश घोगळे, ज्ञानेश्वर सरनोबत तसेच रमा नाईक तसेच इतर मराठा महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी अॅड सुहास सावंत यांनी सांगितले की 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सवानिमित्त पहाटे मालवण किल्ला येथुन शिवज्योत चौके, कट्टा, कसाल, पणदुर मार्गे कुडाळ संत राऊळ महाराज कॉलेज या ठिकाणी आणण्यात येणार आहे त्यानंतर शिवज्योत सर्वत्र शहरात मिरवणुकी द्वारे फिरवली जाईल.तर संध्याकाळी शिवचरीत, शिवकालीन प्रसंगावर आधारित जिल्हास्तरीय भव्य चित्ररथ स्पर्धा आयोजित केली असुन या करीता प्रथम क्रमांकाचे 21 हजार द्वितीय क्रमांकास 15 हजार व तृतीय क्रमांकाचा 11 हजार रूपये अशी पारितोषिके ठेवण्यात आली असुन सर्व सहभागी संघांना मानधन देण्यात येणार आहे.हि स्पर्धा मराठा समाज सभागृह ते जिजामाता पुतळा अशी संपन्न होणार आहे. यावेळी कोरोना काळात काम करणारे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे.

राज्यात सर्वत्र राजकीय सभा, उत्सव, जत्रा, समारंभ सुरू असताना राज्य सरकार केवळ शिवजयंतीलाच केवळ दहा लोकांनी उपस्थित राहून साजरी करावी अशी अट का लावत आहे? असा सवाल उपस्थित करीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ सुचनांचे पालन करू, मात्र अटी झुगारून मोठ्या उत्साहात शिवजंयती साजरी करणार असे सांगितले.जिल्ह्यात सध्या जमावबंदी आदेश असला तरीही आम्ही मोठ्या उत्साहात शिवजयंती उत्सव करणारच, जास्तीत जास्त आताचे सरकार आम्हाला तुरुंगात टाकेल आम्हाला काहीच फरक पडत नाही अशी प्रतिक्रिया सावंत यांनी दिली.आमची संघटना ही राजकीय पक्ष विरहीत संघटना आहे. सध्या राज्य पातळीवर ओबीसी संघटनेत दोन गट पडले असून यामध्ये एक गट राजकारण करून मराठा समाजाला आरक्षणा बाबत विरोध करीत आहेत तर दुसर्या गटाचा आरक्षणाला पाठिंबा आहे. आरक्षण मिळण्यासाठी मागील सरकारपेक्षा या सरकारचा काम करण्याचा वेग अत्यंत कमी असल्याची खंतही सावंत यांनी व्यक्त केली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.