रामेश्वर प्रतिष्ठानच्या क्रिकेट स्पर्धा ; महालक्ष्मी देवबागची सेमी फायनलमध्ये दमदार एन्ट्री

0
452

देवगड | प्रतिनिधी | दि. १७ : श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिठबावच्यावतीने मिठबाव ग्रीन पार्क स्टेडियमवर १६ ते २० फेब्रुवारी या कालावधीत आंतरराष्ट्रीय डे – नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अँड अविनाश माणगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती सावी लोके, जिल्हा परिषद सदस्य मनस्वी घारे देवगड पंचायत सभापती, पंचायत समिती सदस्य सदाशिव ओगले, माजी सभापती सुनील पारकर, निकिता कदम, संदीप साटम, बापू घुरी, मिठबाव सरपंच तथा रामेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाई नरे, उपसरपंच निवेदिता फाटक, सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, शैलेश लोके, रामेश्वर प्रतिष्ठानचे मिठबावचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

पहिल्या दिवशी झालेल्या शेवटच्या सामन्यात मनोज इलेव्हन कणकवली विरुद्ध महालक्ष्मी देवबाग यामध्ये झालेल्या लढतीत महालक्ष्मी देवबाग विजय मिळवत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

पहिल्या दिवशी झालेले सामने – विजयी संघ

माऊली सुपरस्टार तळवणे विरुद्ध मनोज इलेव्हन कणकवली, यामध्ये विजयी संघ मनोज इलेव्हन कणकवली

मयूर स्पोर्ट कट्टा विरुद्ध युवा मांदरुळ राजापूर, यामध्ये विजयी संघ मयूर स्पोर्ट कट्टा

३)साई स्पोर्ट हुंबरठ विरुद्ध ओव्ही इलेव्हन बदलापूर,
यामध्ये विजयी संघ ओव्ही इलेव्हन बदलापूर

४)रवी इलेव्हन डोंबिवली विरुद्ध महालक्ष्मी देवबाग ,
यामध्ये विजयी संघ महालक्ष्मी देवबाग ,

५) मनोज इलेव्हन कणकवली विरुद्ध मयूर स्पोर्ट कट्टा यामध्ये विजेता संघ, मनोज इलेव्हन कणकवली

६) महालक्ष्मी देवबाग विरुद्ध ओव्ही इलेव्हन बदलापूर
यामध्ये विजेता संघ, महालक्ष्मी देवबाग ,

७)मनोज इलेव्हन कणकवली विरुद्ध महालक्ष्मी देवबाग यामध्ये विजयी संघ महालक्ष्मी देवबाग ,

पहिल्या दिवशीच्या सामन्यात सेमी फायनलमध्ये गेलेलं संघ, महालक्ष्मी देवबाग ,

१७ फेब्रुवारीचे होणारे ७ सामने

१)रामेश्वर सावडाव विरुद्ध माणगाव इलेव्हन गोरेगाव

२) तस्मय स्पोर्ट कुसरबे विरुद्ध रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ले

३)खारघर मुंबई विरुद्ध शिवारा सुपर कणकवली

४)चक दे इंडिया वैभववाडी विरूद्ध आर्व्ही इलेव्हन कोरगाव- गोवा

५) १ व २ मधील विजेता संघ

६)३ व ४ मधील विजेता संघ

७)५ व ६ मधील विजेता संघ (सेमिफायनल)

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.