रामेश्वर प्रतिष्ठानच्या क्रिकेट लीगमध्ये आज यांच्यात रंगणार सामने..!

0
203

देवगड | प्रतिनिधी | दि. १९ : मिठबाव श्री रामेश्वर प्रतिष्ठान आयोजित आंतरराष्ट्रीय डे नाईट क्रिकेट क्रिकेट स्पर्धांचे 16 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे . या स्पर्धेच्या तीन दिवसाच्या झालेल्या सामन्यांमध्ये महालक्ष्मी देवबाग, रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ले , व एस टी स्पोर्ट पन्हाळा या तीन संघांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. आज रामेश्वर प्रतिष्ठान आयोजित या स्पर्धेतील ग्रीन पार्क स्टेडियम वर सायंकाळी चार वाजता शिवजयंती साजरी केली जाणार आहे. तर रात्री नऊ वाजता माजी खासदार निलेश राणे यांची उपस्थिती असणार आहे.असे मंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे

१७ फेब्रुवारीला झालेले सामने

१)रामेश्वर सावडाव विरुद्ध माणगाव इलेव्हन गोरेगाव यामध्ये रामेश्वर सावडाव विजयी

२) तस्मय स्पोर्ट कुसरबे विरुद्ध रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ले
यामध्ये रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ले

३)खारघर मुंबई विरुद्ध शिवारा सुपर कणकवली
यामध्ये शिवारा सुपर कणकवली

४)चक दे इंडिया वैभववाडी विरूद्ध आर्व्ही इलेव्हन कोरगाव- गोवा , यामध्ये
आर्व्ही इलेव्हन कोरगाव- गोवा

५)रामेश्वर सावडाव विरुद्ध रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ले
यामध्ये रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ले विजयी

६)शिवारा सुपर कणकवली विरुद्ध आर्व्ही इलेव्हन कोरगाव- गोवा यामध्ये आर्व्ही इलेव्हन कोरगाव- गोवा विजयी

७)रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ले यामध्ये आर्व्ही इलेव्हन कोरगाव- गोवा यामध्ये रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ले विजयी

१८ फेब्रुवारीला झालेले सामने

१)अवधूत स्पोर्ट ओरस विरुद्ध काळभैरव हिंदळे
यामध्ये काळभैरव हिंदळे विजयी

२) एस टी स्पोर्ट पन्हाळा विरुद्ध आर डी स्पोर्ट माणगाव
यामध्ये एस टी स्पोर्ट पन्हाळा विजयी

३)समर्थक इलेव्हन राजापूर विरुद्ध दिर्ब (दिरबा)रामेश्वर जामसंडे यामध्ये समर्थक इलेव्हन राजापूर विजयी

४)सिंधुदुर्ग पोलीस ओरस विरुद्ध शरद काशीद स्पोर्ट कोल्हापूर, यामध्ये सिंधुदुर्ग पोलीस ओरस विजयी

५)काळभैरव हिंदळे विरुद्ध एस टी स्पोर्ट पन्हाळा,
यामध्ये एस टी स्पोर्ट पन्हाळा विजयी

६)समर्थक इलेव्हन राजापूर विरुद्ध सिंधुदुर्ग पोलीस ओरस, यामध्ये सिंधुदुर्ग पोलीस ओरस विजयी

७) एस टी स्पोर्ट पन्हाळा विरुद्ध सिंधुदुर्ग पोलीस ओरस
यामध्ये एस टी स्पोर्ट पन्हाळा विजयी

आज १९ फेब्रुवारीला होणारे सामने

१) रणझुंजार वैभववाडी विरुद्ध इनामदार कोटकामते २)बिर्ला इलेव्हन कल्याण विरुद्ध अलिबाग
३)गणराज इलेव्हन मुंबई विरुद्ध बॉबी स्पोर्ट
४)शिरगाव स्पोर्ट विरुद्ध यश इलेव्हन वाघोटन
५)१ व २ मधील विजेता
६)३ व ४ मधील विजेता
७) ५ व ६ मधील सामन्यातील विजेता

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.