शिवसेना- स्वाभिमानचा नाणारला केवळ निवडणुकीपुरता विरोध: प्रमोद जठार

0
323
कणकवली : शिवसेना- स्वाभिमान या भाजपाच्या मित्रपक्षांचा नाणार प्रकल्पाला केवळ निवडणुकीपुरता विरोध असल्याचा आरोप करतानाच खाजगीत या पक्षांचे कार्यकर्ते नाणारचे समर्थन करत असल्याचा गौप्यस्फोट भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी केला. विरोधकांचे मुद्दे खोडून काढत नाणार प्रकल्पाचे जोरदार समर्थन जठार यांनी केले. १९ मीटर खोल समुद्रतळ असलेल्या विजयदुर्ग बंदराच्या खोलीतच कोकण विकासाची उंची दडलेली आहे. नाणार प्रकल्पच कोकणातील बेरोजगरीवर पर्याय असल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष जठार म्हणाले. मला नाणारचा दलाल म्हणणाऱ्या आमदार नितेश राणे यांनी या प्रकल्पच्या जमिनीतील माझा सहभाग सिद्ध केल्यास मी राजीनामा देईन अन्यथा नितेश यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा असे आव्हान जठार यांनी दिले. नाणार प्रकल्पाला मित्रपक्ष असलेल्या शिवसेना- स्वाभिमान कडून केवळ निवडणुकीसाठी मतांवर डोळा ठेवून विरोध केला जातोय असा आरोप जठार यांनी केला. शिवसेना व स्वाभिमानच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून नाणार बाबतचे गैरसमज दूर करून घ्यावेत. नाणार प्रकल्पाची कंपनी आर आर पी सी एल च्यावतीने प्रकल्पाच्या प्रचार व प्रसारासाठी प्रकल्प बधितांच्या भेतीगाठीला सुरुवात झाल्याचेही जठार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here