अरे देवा..! आदल्या दिवशी लावली लग्नाला हजेरी, दुसऱ्या दिवशी ‘हे’ मंत्री कोरोना पॉझिटिव्ह

0
446

नाशिक : महाविकासआघाडी सरकारमधील आणखी एक मोठे मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी संपर्कात आलेल्या व्यक्तींना टेस्ट करून घेण्याचं आवाहन केलं आहे. मंत्रिमंडळातल्या सहा मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याने राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचं संकट वाढताना दिसत आहे.

महत्त्वाचं म्हणजे कालच एका लग्न सोहळ्यात भुजबळ यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित होते. याआधी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, मंत्री बच्चू कडू आणि एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाल्याचं पुढे आलं होतं. मंत्रिमंडळातील तब्बल 6 मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.