‘त्या’ महिलांना राष्ट्रवादी देणार न्याय ; धनंजय मुंडेंच वेधणार लक्ष

0
239

सावंतवाडी | प्रतिनिधी | दि. २३ :  बी.व्ही.जी. इंडिया प्रा. लि. पुणे व क्रिस्टल इंटिग्रेटेड प्रा. लि. मुंबईच्या महिला कर्मचाऱ्यांचे ९ महिने वेतन थकीत ठेवल‌. या कंपनीविरोधात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मागासवर्गीय व आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, सावंतवाडी समोर या महिलांनी कामबंद आंदोलन छेडले. गेले ८ दिवस हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहाबाहेर अशाच प्रकारच आंदोलन सुरू आहे.‌ सावंतवाडी येथील आंदोलनाला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. या महिलांची व्यथा त्यांनी जाणून घेतली. तर पगार थकित ठेवणाऱ्या कंपनीच्या मॅनेजरला याचा जाब विचारला. दरम्यान, जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या माध्यमातून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच लक्ष वेधत या महिलांना न्याय मिळवून देणार असल्याचा मत राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी व्यक्त केले.

यावेळी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष दीपक जाधव, शहराध्यक्ष देवा टेंमकर, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, जावेद शेख, चित्रा बाबर-देसाई, सचिन पाटकर राजू धारपवार, जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्याक इफ्तिकार राजगुरू आदी उपस्थित होते.‌

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.