रवी जाधव विरोधात पालिकेची पोलीसात तक्रार..!

0
784

सावंतवाडी | प्रतिनिधी | दि. २३ :  शहरात अनधिकृत स्टॉल लावल्यानं‌ सावंतवाडी नगरपालिकेच्यावतीनं सावंतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. या तक्रारीनुसार सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर संबंधित स्टॉलधारकाला कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी नोटीस काढण्यात येणार आहे. दरम्यान, संबंधित स्टॉलधारक रवी जाधव यांनी स्टॉल काढू देणार नाही असं सांगत धमकी दिल्याची तक्रार तक्रारदारानं दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.