नवलराज काळेंंनी निवेदनाद्वारे ‘याकडे’ वेधलं आमदार पडळरांच लक्ष

0
156

वैभववाडी | प्रतिनिधी | दि. २३ : तालुक्यातील धनगरवस्तींमधील विकासकामासाठी निधी मिळावा या मागणीचे निवेदन भाजपा युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीसयांनी आ.गोपीचंद पडळकर यांना दिले. तसेच प्रलंबित कामांसंदर्भात त्यांचे लक्ष वेधले.

आ.पडळकर हे सोमवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले होते. आपल्या दौऱ्यात आमदार पडळकर यांनी वैभववाडी भाजपा तालुका कार्यालयाला भेट दिली. यावेळी तालुक्यातील धनगर वाड्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात युवा मोर्चाचे नवलराज काळे यांनी त्यांचे लक्ष वेधले. सडुरे शिराळे गावातील रस्त्याच्या कामांसह स्ट्रीट लाईटकरिता निधी मिळावा अशी मागणी केली. तसेच नापणे धनगरवाडी साठी समाज मंदिर उभारण्यात याव व वायंबोशी गावात एसटी बस सेवा सुरू व्हावी अशा मागणीचे निवेदन आ.पडळकर यांना दिले.

यावेळी वैभववाडी तालुका भाजपा तालुका अध्यक्ष नासीर काजी, जयेंद्र रावराणे,खांबाळे पंचायत समिती विभागीय अध्यक्ष प्रकाश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा हुसेन लांजेकर, राजू पवार, स्वप्निल खानविलकर,वैभववाडी तालुका युवा मोर्चा अध्यक्ष किशोर दळवी, आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.