सावंतवाडी | प्रतिनिधी | दि.२३: स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत आज सावंतवाडी येथील नरेंद्र डोंगरावर स्वच्छता अभियान राबवण्यात आले होते. या अभियानात रोटरी क्लब, युवा सिंधू या सामाजिक संस्था तर भोसले पॉलिटेक्निक कॉलेजचे विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले.
या स्वच्छता अभियानाचा शुभारंभ नगराध्यक्ष संजू परब यांनी श्रीफळ वाढवून केला. यावेळी ते बोलताना म्हणाले की, सावंतवाडी हे स्वच्छ सुंदर शहर आहे. सावंतवाडी शहर स्वच्छ रहावे यासाठी आपण सर्व संघटना करत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे मत त्यानी व्यक्त केले आहे. यावेळी शहरात दारू बॉटल कुठेही सापडल्यास पोलिसां कडून कारवाई करून घेऊ. असा इशारा देखील त्यानी दिला आहे.
यावेळी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर आदी मान्यवर उपस्थित होते.