विषारी द्रव्य प्राशन केल्याने महिलेचा मृत्यू

0
1229

कुडाळ, दि. २३ : तालुक्यातील तेर्सेबांबर्डे येथील रहिवासी शिवानी शिवदास पुरळकर (४८) या महिलेने विषारी द्रव्य प्राशन केल्याने तिचा जिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले.
तेर्सेबांबर्डेतील पुरळकर यांनी रविवारी विषारी द्रव्य प्राशन केल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्यावर येथे उपचार चालू असतानाच त्यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. या घटनेची फिर्याद ओरोस पोलिस ठाण्यात जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी उल्हास लोखंडे यांनी दिली. या आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.