अतुल रावराणे यांच्या कासार्डे येथील सिलिका मायनिंगविरोधी लढ्याला खासदार राऊत यांच्या पत्राने बळ

0
276

कणकवली : कासार्डे सीलिका मायनिंग प्रकरणात काही दिवसापूर्वी अतुल रावराणे यांनी कारवाई व्हावी अशी मागणी केली होती आणि आता महसूल विभागाने अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक वर कारवाईचा बडगा उगारला आहे. तसेच याआधी जिल्हा नियोजनाच्या बैठकीमध्येही अतुल रावराणे यांनी अनधिकृत वाळू वाहतूक व अनधिकृत वाळू उपसा मुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे व शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूलही बुडत असे सांगत त्या अनधिकृत वाळू व्यवसायवर कारवाई व्हावी अशी मागणी केली होती. आता या मागणीला खासदार विनायक राऊत यांनी एक पत्र काढत शिवसेना नेते अतुल रावराणे यांच्या सिलिका मायनिंग विरोधी लढ्याला बळ दिले आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.