कणकवली पं. स. च्या ‘डेमो हाऊस’चे २६ ला भूमिपूजन 

0
304

कणकवली | प्रतिनिधी | दि. २४ : प्रधानमंत्री महा आवास योजनेतील घरकुलांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि लाभार्थ्यांना मार्गदर्शक होण्यासाठी ‘डेमो हाऊस’ कणकवली पंचांयत समितीच्या आवारात उभारले जाणार आहे.या डेमो हाऊसचे भूमिपूजन शुक्रवार २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता आमदार नितेश राणे यांच्या हस्ते केले जाणार आहे. या भूमिपूजन सोहळ्याला सभापती मनोज रावराणे यांच्या सह सर्व पंचायत समिती सदस्य उपस्थित राहणार आहेत. कोरोनाचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम घेतला जाणार आहे.

त्यानंतर सकाळी १० वाजता पंचयत समितीच्या पपू भालचंद्र बाबा सभागृहात किल्ले बनवा स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांच्या सत्कार आमदार नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे यांच्या संकल्पनेतून “माझी शाळा…माझा किल्ला” हा उपक्रमात आयोजित केला होता.त्याला सर्वच शाळातून उस्फुर्त प्रतिसाद लाभला होता. या किल्ल्याचे परीक्षण करून विभाग स्थरावर आणि तालुका स्थरावर असे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक काढण्यात आले आहे त्या सर्वांचे अभिनंदन आणि विजेत्यांचे बक्षीस वितरण या कार्यक्रमात केले जाणार आहे.या कार्यक्रमात सुद्धा कोरोनाचे सर्व नियम पाळले जाणार आहेत.अशी माहिती गटविकास अधिकारी चव्हाण यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.