वेंगुर्ला न.प. च्या एवढ्या मोठ्या रक्कमेच्या शिल्लकी अर्थसंकल्पास मंजुरी…!

0
254

वेंगुर्ला : दि. २६ : वेंगुर्ला नगरपरिषदेच्या २०२१ – २२ या आर्थिक वर्षाचा २७ कोटी ४६ लाख ९७ हजार ७६ रक्कमेच्या शिल्लकी अर्थसंकल्पास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. वेंगुर्ले न. प. च्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्प सादर करण्यात आला.

यावेळी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, नगरसेवक विधाता सावंत, सुहास गवंडळकर, प्रशांत आपटे, नागेश गावडे, प्रकाश डीचोलकर, धर्मराज कांबळी, नगरसेविका शीतल आंगचेकर, कृतिका कुबल, कृपा गिरप, श्रेया मयेकर, स्नेहल खोबरेकर, साक्षी पेडणेकर, मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

कोणतीही कर वाढ न करता आजचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पाचे वाचन लेखापाल श्री. परब यांनी केले. यावेळी एकूण महसूली जमा १२ कोटी ७० लाख ६५ हजार ८०० रुपये असून एकूण महसुली खर्च १७ कोटी २८ लाख १०० रुपये झाला आहे. तर भांडवली जमा ५९ कोटी ३२ लाख ५४ हजार २०० रुपये असून एकूण भांडवली खर्च ४७ कोटी ९७ लाख ५८ हजार ७०० रुपये झाला आहे. एकूण ९२ कोटी ७२ लाख ५५ हजार ८७६ रुपये जमा मधून एकूण खर्च ६५ कोटी २५ लाख ५८ हजार ८०० रुपये झाला असून २७ कोटी ४६ लाख ९७ हजार ७६ रुपये शिल्लक राहिले आहेत. या शिलकी रकमेच्या अर्थसंकल्पाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली या अर्थसंकल्पावर चर्चा करताना नगरसेवक प्रशांत आपटे यांनी स्वागत, भूमिपूजन, संदेश यासाठी तरतूद करण्यात आलेला ३ लाख निधीत वाढ करून ती ५ लाखपर्यंत करावी अशी सूचना केली.

साथीच्या रोगावर उपाययोजनेची रकमेत वाढ करण्याची मागणी केली. नगरसेवक विधाता सावंत यांनी शहरात विविध प्रदर्शने, बैठका, सर्कस अशा माध्यमातून त्यांच्याकडून दिवसाला कमीत कमी १०० रुपये एवढा कर वसूल करण्यात यावा मात्र यात धार्मिक कार्यक्रम वगळण्यात यावे अशी मागणी केली. तसेच शासकीय जागेत जाहिरात करण्याऱ्या कंपन्याकडून कर वसूल करा अशी मागणी केली. शहरात विद्युत दिवाबत्तीसाठी वापरण्यात आलेल्या एलइडी मुळे न प चा खर्च कमी झाला यासाठी नगरसेवक विधाता सावंत यांनी अभिनंदन केले. तसेच अर्थसंकल्प अगदी सोप्या पद्धतीने सादर केल्याबद्दल लेखापाल व त्यांना मदत केलेल्या सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.