वेंगुर्ल्यात ‘या’ कोव्हीड योद्ध्यांचा होणार सन्मान…!  

0
181
वेंगुर्ला | दि. २६ : कोरोना काळात आपल्या जीवाची तमा न बाळगता अनेकांनी स्वतःला झोकून देत समाजासाठी काम केलं. कोणतेही अपेक्षा न ठेवता त्यांनी केलेलं हे काम खरच समाजासाठी प्रेरणादायी आहे…याच भावनेतून कोकणच महाचॅनेल सिंधुदुर्ग LIVE आपल्या ६ व्या वर्धापनदिनी अशा कोरोना योध्यांचा सन्मान करत आहे.
देशावर कोणतही संकट आल तर कोकणी माणूस कधीच मागे नसतो. देशावर आलेल्या कोरोना संकटकाळात कोकणी माणूस सर्वच बाबतीत पुढे राहिलाय. वेंगुर्ल्यातही अनेकांनी कोरोना काळात आपल काम चोख पार पाडलं. आपल्या कामाचा समाजातील गरजूंना कसा फायदा होईल याची दक्षता घेतली. यात कृषिभूषण एम. के. गावडे, शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, कोचरा सरपंच साची फणसेकर, योगसाधनेच्या डॉ. वसुधा मोरे या सर्वाना कोकणच महाचॅनेल सिंधुदुर्ग LIVE मार्फत वेंगुर्ला इथं वर्धापनदिनानिमित्त येणाऱ्या कोरोना सिंधुविजय चित्ररथावेळी गौरविण्यात येणार आहे.
…असा निघणार कोरोना सिंधुविजय चित्ररथ
कोकणचंं महाचॅनेल सिंधुदुर्ग LIVEच्या ६ व्या वर्धापनदिनाला वेंगुर्लेत कोरोना विषयक जनजागृती करणारा कोरोना सिंधुविजय चित्ररथ निघणार आहे. २ मार्चला दुपारी १ वा. हा चित्ररथ शिरोड्यात येणार असून तेथून वेंगुर्ला इथं जाणार आहे. यावेळी कोव्हीड योद्ध्यांचा सन्मान होणार आहे.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.