राणेंच्या हॉस्पिटलमध्ये उद्यापासून मोफत कोरोना लसीकरण…!

0
473

सिंधुदुर्गनगरी : दि. ०२ : पडवे येथील राणेंच्या हॉस्पिटलमध्ये उद्यापासून कोरोना लसीकरणाला सुरुवात होत असून हे लसीकरण पूर्णपणे मोफत केले जाणार आहे. या लसीकरणाचा संपूर्ण खर्च खासदार नारायण राणे करणार आहेत.
कोरोनाच्या लसीकरणाला खाजगी हॉस्पिटलमध्ये मान्यता देण्यात आली आहे. या अंतर्गत लसीकरण केंद्र म्हणू न नारायण राणे यांच्या पडवे हॉस्पिटलला मान्यता मिळाली आहे. ३ मार्चला या लसीकरणाचा शुभारंभ होत असून यासाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे, तसेच खासदार नारायण राणे उपस्थित राहणार आहेत.

इतर ठिकाणी २५० रुपयांना मिळणारी ही लस पडवे येथे पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. आर. एस. कुलकर्णी, सौ. अपूर्वा पडते यांनी केले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.