सावंतवाडी पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा ठरला ऊर्जा देणारा; युवा पत्रकार भुषण आरोसकर,जतीन भिसे,जेष्ठ पत्रकार वसंत केसरकर,मोहन जाधव आणि राजेश मोंडकर यांना पुरस्कार प्रदान

0
407

सावंतवाडी : दि. ०७ : तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा सावंतवाडी इथं पार पडला. पत्रकार संघाच्यावतीनं जाहीर करण्यात आलेल्या या पुरस्काराचे वितरण रविवारी स्व. बाळासाहेब ज्ञानप्रबोधिनी इथं झाल. माजी राज्यमंत्री आ. दीपक केसरकर यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला यांनी पुष्पहार अर्पण करत या सोहळ्यास प्रारंभ झाला. यावेळी वैनतेयकार मे. द. शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार युवा पत्रकार भुषण आरोसकर यांना प्रदान करण्यात आला. तर कै. चंदु वाडीकर आदर्श समाजसेवक पुरस्कार, ज्येष्ठ पत्रकार वसंत उर्फ अण्णा केसरकर, माजी आमदार, ज्येष्ठ पत्रकार जयानंद मठकर आदर्श पत्रकार पुरस्कार राजेश मोंडकर, बाप्पा धारणकर अष्टपैलू स्मृती पुरस्कार छायाचित्रकार जतिन भिसे, जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार मोहन जाधव यांना प्रदान करण्यात आला.

यावेळी पुरस्कार प्राप्त पत्रकारांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी आपणाला मिळालेल्या पुरस्कारात कोकणचं नंबर १ महाचॅनेल सिंधुदुर्ग लाईव्हचा, इडिटर इन चीफ सागर चव्हाण यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्यामुळे आदर्श पत्रकार पुरस्कार आपणाला मिळाला अशा भावना आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त युवा पत्रकार भुषण आरोसकर यांनी व्यक्त केल्या‌. यावेळी माजी राज्यमंत्री आ. दीपक केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा बँक संचालक विकास सावंत, व्हिक्टर डॉन्टस, तहसीलदार राजाराम म्हात्रे, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, ज्येष्ठ पत्रकार रमेश बोंद्रे, अण्णा केसरकर, अँड. अनिल निरवडेकर, सिंधुदुर्ग लाईव्हचे इडिटर इन चीफ सागर चव्हाण, पत्रकार अँड. संतोष सावंत, हरिश्चंद्र पवार, अभिमन्यू लोंढे, अशोक दळवी, पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय देसाई, खजिनदार रामचंद्र कुडाळकर यांसह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.