इंधन, गॅस दरवाढीवर राज्यसभेत गोंधळ ; कॉंग्रेस आक्रमक

0
173

नवी दिल्ली : दि. ०८ : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात आज संसदेचं कामकाज पुन्हा एकदा सुरू झालं. परंतु, राज्यसभेचं कामकाज सुरू होताच काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधी खासदारांनी इंधर दरवाढ, घरगुती गॅॅस अशा वेगवेगळ्या विषयांवर सरकारला घेरलं. या मुद्यावर राज्यसभेत जोरदार हंगामा पाहायला मिळाला. त्यामुळे सदनाचं कामकाज तासाभरासाठी स्थगित करण्यात आलं. त्यानंतरही गोंधळ सुरूच राहिल्याचं दिसताच सभापतींनी सदनाचं कामकाज दुपारी १ वाजपर्यंत स्थगित करण्यात आलं.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सोमवारी सुरू झाल्यानंतर राज्यसभेत विरोधी पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाझलेल्या किंमतींचा मुद्दा उचलून धरला. सदनाचं कामकाज स्थगित करत या मुद्यावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली.

आज संपूर्ण देशातील लोक चिंतेत आहेत. आम्ही सभापतींकडे मागणी करतो की सदनाचं कामकाज स्थगित करून पेट्रोल डिझेल्च्या किंमतींवर चर्चा केली जावी. आज देशात पेट्रोल १०० रुपयांवर तर डिझेल जवळपास ८० रुपये प्रती लीटरवर पोहचलंय, असं मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.