नागपुरात मुसळधार पावसामुळे विधिमंडळातील वीज गायब ; मोबाइल टॉर्चच्या उजेडात विरोधकांचा आंदोलन

0
490

नागपुर : नागपुरात गुरुवारी (५ जुलै) रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. यामुळे येथील अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत. दरम्यान, मुसळधार पावसामुळे विधान भवनातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. नागपुरात पावसाळी अधिवेशन सुरू असून कामकाज सुरू होण्यापूर्वीच वीज गेल्याने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची धावपळ उडाली आहे. विधिमंडळाला वीजपुरवठा सुरळीत सुरू रहावा यासाठी उभारण्यात आलेल्या लाईटरूम मध्ये पाणी शिरल्याने वीजपुरवठा बंद करण्यात आल्याची माहिती उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. दरम्यान, वीजपुरवठा खंडीत झाला नसून तो तात्पुरता बंद करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितले. वीज गेल्याने विविध मागण्यांसाठी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करणाऱ्या विरोधकांनी मोबाइलचे फ्लॅश लाईटचा आधार घेत आंदोलन करावे लागत आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेयांनी अंधारातच बैठका घेत दिवसभराची रणनीती आखणे सुरू ठेवले होते.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.