कोकणात शिमगा उत्सवावर कोरोनाचं सावट…!

0
829

रत्नागिरी : दि. ११ : कोरोना विषाणूच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आता रत्नागिरीत प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिमग्याच्या सणासाठी कोकणात जायला निघालेल्या चाकरमन्यांच्या उत्साहावर पाणी फेरले जाणार आहे.  कोरोना पार्श्वभूमीवर रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी गुरुवारी यासंदर्भातील आदेश जारी केले.

चाकरमन्यांनी कोकणात येऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यानंतरही गावी येण्याच्या निर्णयावर ठाम असणाऱ्या लोकांसाठी काही नियम घालून देण्यात आले आहेत. त्यानुसार कंटेन्मेंट झोनमधून येणाऱ्या चाकरमान्यांना कोरोना टेस्ट बंधनकारक आहे. जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी ७२ तास आधीचा कोरोना चाचणी अहवाल दाखवणे बंधनकारक आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.