थकीत वीजबीले भरणाबाबत महावितरणची जनजागृती

0
520

वैभववाडी | प्रतिनिधी | दि. १४ : कोरोना काळातील थकित वीज बिलांच्या वसुलीसाठी वीज वितरण कंपनीकडून मोहीम राबवण्यात आली आहे.” माझे विजबिल माझी जबाबदारी” या उपक्रमांतर्गत वीज बिल भरणा बाबत जनजागृती करण्यात येत आहे. वैभववाडी विभागाअंतर्गत शहरातील सार्वजनिक ठिकाणी वाहने यांच्या वर स्टीकर ,बँनर लावून वीज बील भरण्यास ग्राहकांना प्रोसाहित करण्यात येत आहे.

कोरोना काळात वीज बीले थकीत राहिली आहे. या बिलांची वसुली करण्यासाठी वीज वितरण कंपनी कडून मोहीम राबविली जात आहे. या मोहीमे अंतर्गत “माझ वीजबिल माझी जबाबदारी” या आशयाचे स्टीकर ,बँनर कंपनी मार्फत लावून जनजागृती केली जात आहे.तालुक्यातील बस स्थानक, बाजारपेठ, रिक्षा स्टँड तसेच सर्व सार्वजनिक ठिकाणी महावितरण कंपनीकडून स्टिकर बॅनर लावून वीज ग्राहकांना वीज बिल भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

त्याचबरोबर गावागावांमध्ये जाऊन गावच्या ग्रामपंचायतींमध्ये या उपक्रमाची माहिती देण्यात येत आहे. ग्राहकांनी वीज बिल भरून कंपनीला सहकार्य करण्याचे आवाहन वीज वितरणचे अधिकारी, कर्मचारी करीत आहेत.नुकत्याच झालेल्या महिला दिनादिवशी संपूर्ण वीजबिल भरणार्‍या महिलांचा वीज वितरण कंपनीकडून सत्कार करण्यात आला. ग्राहकांनी थकीत वीज बिल भरून कंपनीला सहकार्य करावे असे आवाहन उपकार्यकारी अभियंता कृष्णांत सुर्यवंशी यांनी केले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.