डेब्यूमधील अर्धशतकी खेळीनंतर ईशान झाला भावूक ; दिलं ‘यांना’ श्रेय

0
204

अहमदाबाद | दि. १५ : इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात ईशान किशनने भारतीय संघात डेब्यू केला. आपल्या पहिल्याच सामन्यात ईशानने शानदार 56 धावा केल्या. यामुळे भारतीय संघाने इंग्लंडला 7 विकेटने हरवून सीरिजमध्ये 1-1 ची बरोबरी केली. ईशानला या उत्तम खेळाकरता ‘मॅन ऑफ द मॅच’ देण्यात आला.

या शानदार खेळानंतर ईशानने सांगितलं की,’या खेळाचं संपूर्ण श्रेय हे माझ्या वरिष्ठ खेळाडूंना जातं. ज्यांनी मैदानावर जाऊन मला माझा खेळ खेळण्याचा सल्ला दिला. पहिल्याच सामन्यात आपण टॉपच्या टीमसोबत खेळणं सोपी गोष्ट नाही.’

पुढे ईशान म्हणाला की,’मुंबई इंडियन्सच्या संघात खेळण्याचा मला खूप फायदा झाला. याच सामन्यातील खेळात मला सातत्य ठेवायचं आहे. मला माहित नाही असा अनुभव मला पुन्हा मिळेल की नाही. पण आता मी खूप आनंदी आहे. मी माझ्या सर्व कोचचे आभार मानतो. ज्यांच्यामुळे मला हे यश मिळालं.’

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.