माजी नगराध्यक्षांच्या उपोषणाला यश..!

0
213

वैभववाडी | प्रतिनिधी | दि. १६ : माजी नगराध्यक्षा अक्षता जैतापकर यांनी केलेल्या उपोषणाला यश आले आहे. त्यांनी केलेल्या मागण्यांची पुर्तता करण्याचे आश्वासन नगरविकास अधिकारी वैभव साबळे यांनी दिले आहे. यासंदर्भात तशा सुचना त्यांनी नगरपंचायत प्रशासनाला दिल्या आहेत.

शहरातील पाणी, स्वच्छता, घरबांधणी परवानगीसह अन्य विषयांकरिता माजी नगराध्यक्षा अक्षता जैतापकर यांनी महीला दिनी उपोषण केले होते. त्या उपोषणावेळी जिल्हा नगरविकास अधिकारी यांनी या विषयासंबंधी बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे जैतापकर यांना आश्वासन दिले होते. त्यानुसार आज जिल्हा नगरविकास अधिका-यांच्या उपस्थितीत नगरपंचायतीमध्ये बैठक झाली. जैतापकर यांनी मांडलेल्या प्रत्येक विषयांवर चर्चा झाली. ते सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश नगरविकास अधिका-यांनी नगरपंचायत प्रशासनाला दिले आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.