…अखेर कोचरावासीयांचे ‘हे’ स्वप्न होणार पूर्ण ; साची फणसेकरांच्या प्रयत्नांना यश

0
479

वेंगुर्ला | प्रतिनिधी | दि. १९ : तालुक्यातील कोचरे गावात बीएसएनएल टॉवर होण्यासाठी सरपंच सौ साची विकास फणसेकर यांनी केलेल्या प्रयत्नांना मोठे यश आले असून टॉवरचे काम पूर्ण होऊन तो लवकरच सुरू होणार असल्याने कोचरा वासीयांचे हे स्वप्न पूर्ण होणार आहे.

हा बीएसएनएल टॉवर सुरू होण्यासाठी सरपंच यांनी वारंवार पाठपुरावा करून हा बीएसएनएल टॉवर होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. यावेळी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर यांनी दिलेल्या आदेशानुसार बीएसएनएल प्रशासनाने हा टॉवर २८ फेब्रुवारी पर्यंत कार्यान्वित करण्याचे आश्वासन दिले होते. यानुसार या टॉवरचे काम पूर्ण झाले मात्र लाईट कनेक्शन साठी मोठा निधीची गरज होती तेवढा निधी बीएसएनएल कडे नसल्याने टॉवर कार्यान्वित होण्याच्या प्रतीक्षेत होता.

दरम्यान, यासाठी तात्काळ सरपंच यांनी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर यांचे लक्ष वेधले यावेळी तात्काळ निधी देण्याचे आश्वासन दिले होते. यानुसार तात्काळ कार्यवाही करून जिल्हा नियोजन मधून यासाठी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे आता टॉवर कार्यान्वित होण्याचा मार्ग खुला होणार आहे. अशी माहिती सरपंच सौ फणसेकर यांनी दिली आहे.

यावेळी पुढे बोलताना सौ फणसेकर म्हणाले की, कोचरा गावाला विकासासाठी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर यांनी भरघोस निधी देऊन नेहमीच झुकते माप दिले आहे. असे सांगत सरपंच यांनी पालकमंत्री, खासदार, आमदार यांचे आभार मानले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.