उपरकर शुटिंगच्या नेमबाजांची राष्ट्रीयस्तरावर धडक ; अतुल नाखरेंच ‘सुवर्ण’यश

0
138

सिंधुदुर्ग | दि. १९ : सिंधुदुर्गच्या नेमबाजांनी कॅप्टन एस. जे. इजीकल मेमोरीअल महाराष्ट्र स्टेट शुटींग चॅम्पीयनशीप मध्ये यश मिळवलंय. सिंधुदुर्गच्या नेमबाजांची पूर्व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड करण्यात आलीय. तर गोवा राज्याचे प्रतिनीधीत्व करणारे सावंतवाडीचे नेमबाज अतुल लक्ष्मण नाखरे यांनी २५ मीटर .२२ पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक पटकावीले तर कु.श्रीया अतुल नाखरे हिने १० मीटर पिस्तूल प्रकारात सबयुथ गटात प्रथम क्रमांक मिळवत पूर्व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत आपले स्थान पक्के केले.

त्याच बरोबर महाराष्ट्र राज्याचे प्रतिनीधीत्व करणारे जिल्हयातील ६ खेळाडू नुकत्याच घेण्यात आलेल्या कॅप्टन एस.जे. इजीकल मेमोरीअल महाराष्ट्र स्टेट शुटींग चॅम्पीयनशीप मध्ये सहभागी झाले होते.

यात साहिश दिगंबर तळणकर (दोडामार्ग) याने सबयुथ गटात १० मी. पिस्तूल प्रकारात ४०० पैकी ३६२ गुण मिळवून चौथा क्रमांक मिळवीला. तसेच स्वानंद प्रशांत सावंत याने ३४८ गुण, आयुष दत्तप्रसाद पाटणकर ३४१ गुण तर यश नामदेव तांबे याने ४०० पैकी ३३२ गुण मिळवीले. त्याचबरोबर १० मी एअर रायफल प्रकारात वैष्णवी गोविंद भांगले (बांदा) हिने सबयुथ गटात ४०० पैकी ३८१ गुणांची नोंद करत पाचवा क्रमांक मिळवीला तर शार्दुल सुधीर शिरसाट (बांदा) याने ३४८ गुण मिळवीले. या सहाही खेळाडूंची निवड पूर्व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत तसेच के. एस. एस. आंतर शालेय राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी झाली आहे.  हे सर्व खेळाडू उपरकर शुटिंग अॅकॅडमी सावंतवाडी व बांदा येथे सराव करणारे असून त्यांना प्रशिक्षक कांचन वसंत उपरकर यांचे प्रशिक्षण लाभले तसेच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विक्रम भांगले यांचे मौलीक मार्गदर्शन मिळाले.

निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे सिंधुदुर्ग जिल्हा शुटींग असोसीएशनच्या पदाधीकाऱ्यांनी विशेष अभिनंदन केले.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.