पर्यटन महासंघाला उपवनसंरक्षकांच ‘हे’ आश्वासन..!

0
195

सावंतवाडी दि.23- वन आणि पर्यटन यांचा घनिष्ठ संबंध आहे. हिरवागार निसर्ग ही सिंधुदुर्ग जिल्ह्याची खरी ओळख आहे. हाच धागा पकडून येणाऱ्या पर्यटकांना वन खात्याच्या माध्यमातून कसे आकर्षित करता येईल यासाठी सावंतवाडी वन विभागाचे सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन महासंघाला सहकार्य राहील असे आश्वासन सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक शहाजी नारनवर यांनी दिले.

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन महासंघाचे कार्याध्यक्ष सतीश पाटणकर जिल्हा उपाध्यक्ष डी. के . सावंत तालुकाध्यक्ष जितेंद्र पंडित सचिव विनोद रेडकर खजिनदार मार्सेलिना डिसोजा यांनी उपवनसंरक्षक नारनवर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पर्यटन बाबीबाबत चर्चा केली. आंबोली, तळकट, नरेंद्र वन उद्यान, तोंडवली अशी पर्यटकांना आकर्षित करणारी असंख्य स्थळे आहे. वनखात्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी काय करता येईल याबाबत आपण पुढील महिन्यात बोलू तसेच आपल्या महासंघाबरोबर अन्य स्वयंसेवी संस्थांची मदतही घेऊ असे नारनवर यांनी सांगितले.

येणारा पर्यटक ज्यावेळी सिंधुदुर्गात प्रवेश करेल त्यावेळी तो इथल्या निसर्गाच्या प्रेमात पडेल अशा प्रकारची वृक्ष लागवड करण्याचा आपला मानस आहे. त्याचबरोबर आवश्यक त्याठिकाणी फलकांची उभारणी करण्यात येईल. याकाही महासंघाने योगदान देण्याचे आव्हान उपवनसंरक्षक नारनवर यांनी केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.