‘मिस्त्राल ऑफ मिलन’ सौंदर्य स्पर्धेत सिंधुदुर्ग LIVE ची गेस्ट अँँकर अदिती बाणावलीकर विजेती…    

0
1540

कुडाळ : प्रतिनिधी | दि. ३१ : ‘मिस्त्राल ऑफ मिलन’ या राष्ट्रीय पातळीवरील सौंदर्य स्पर्धेत सिंधूकन्या अदिती बाणावलीकर हिने बाजी मारलीय. २८ मार्चला हि स्पर्धा ऑनलाईन सौंदर्य स्पर्धा झाली होती. देशभरातून अनेक युवतींनी या स्पर्धेत भाग घेतला होता. अशा राष्ट्रीय प्लॅॅटफॉर्मवरील स्पर्धेत ग्रामीण भागातील युवतीला विजेतपद मिळण तस दुर्मिळच. मात्र, अदितिने सौंदर्यासोबतच आपल्या टॅॅलेंटने हा करिष्मा करून दाखवला. या स्पर्धेत पहिल्या राउंड पासूनचं अदितीने आपली चुणूक दाखवली होती. खडतर अशा अंतिम फेरीत पहिलं स्थान मिळवत अदितीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव रोशन केलं.

अदिती कुडाळ येथील सौ. प्रियांका प्रसाद बाणावलीकर यांची मुलगी असून अवघ्या १९  वर्षाची असताना तिनं हे राष्ट्रीय पातळीवरील सौंदर्य स्पर्धेत यश प्राप्त केलं आहे. तिचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण ओरोस येथील डॉन बास्को स्कुल इथं झालं तर सध्या ती आपलं पद्वित्तर शिक्षण राजस्थान इथं एका नामांकित शिक्षण संस्थेत घेत आहे. वयाच्या १६ वर्षी तिने कोकणचं महाचॅॅनेल ‘सिंधुदुर्ग लाईव्ह’ मध्ये अँकरींग करत आपल्या करिअरची सुरवात केली होती. तिच्या या यशाबद्दल जिल्हाभरातून तिचं विशेष कौतुक होत आहे.

 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.