अरेरे…बेकरीला आग ; मोठंं नुकसान

0
2596

सावंतवाडी | प्रतिनिधी | दि. ०२ : सावंतवाडी शहरातील कॉलेज जवळील एका बेकारीला आग लागली. आग लागल्यान मोठ नुकसान झालंय. आज सकाळी दहाच्या सुमारास हि घटना घडली.

सावंतवाडी शहरातील रामेश्वर प्लाझा जवळील काॅलेज मार्गावर असलेले गौरव जाधव यांच्या बेकरीला आग लागल्याने मोठे नुकसान झाले. आज सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. दुकानालगत बाजूला थंड पेयांचा बॉक्स ठेवण्यात आला होता. या बॉक्सला अचानक आग लागली. लागलीच दुकान मालक गौरव जाधव, आनंद गावकर यांना समजतात त्यांनी लागलीच पालिकेचा बंब पाचारण केला. घटनास्थळावर बंब वेळीच दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला. शेजारील संजय नाईक व अन्य दुकान चालकानी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. ही आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. मात्र दुकानातील आतील सामान सुरक्षित राहिले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.