विनायक साटम यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

0
391

देवगड | प्रतिनिधी | दि. ३ : देवगड तालुक्यातील शिरगाव गावातील रामनगर येथील रहिवासी विनायक विष्णू साटम मालवण आचरा पोलीस स्थानकात सेवा बजावत होते. ३१ मार्च २०२१ रोजी आपल्या सेवेतून सेवानिवृत्त झाले. गेली ३८ वर्षे त्यांनी पोलीस खात्यात प्रामाणिक पणे सेवा बजावली आहे. विनायक साटम यांचा सेवानिवृत्तपर श्री देवी बांदेश्वर मंडळ शिरगाव रामनगरच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख मिलिंद साटम, कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष संभाजी साटम आदी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.